Saturday, 9 February 2013

शेवग्याचे नवे वाण

शेवगा ही भारतातील बहुतेक राज्यातील आवडती व लोकप्रिय भाजी आहे. शेवगा या भाजीचे जगभर गेले दशकात महत्त्व वाढले. त्याला दोन प्रमुख कारणे आहेत.
१) शेवगा बियापासून जे तेल निघते, त्याला बेन ऑइल म्हणतात. हे तेल सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूत वंगण म्हणून वापरतात. मोबाईल, घडय़ाळे, टीव्ही इत्यादी दर लिटरला २० हजार रुपयांनी ते जाते.
२) वाळलेल्या शेवगा बियाची पावडर ही पाणी र्निजंतूक करण्यासाठी जगभर वापरली जाते. जागतिक आरोग्य संघटनेने दर १०००लि.पाणी र्निजतुक करण्यास ८०० ग्रॅम पावडर वापरावी असे सुचित केले आहे. त्यामुळे शेवगा बियांची पावडर जगभर निर्यात होते.
शेवगा स्वतंत्र शेती महाराष्ट्रात आम्ही १९८१ पासून सुरू केली. स्वतंत्र शेवगा शेती किंवा फळबागात मिश्र किंवा अंतर पीक म्हणून शेवगा शेती आता महाराष्ट्रात ९०० ते १२०० एकरावर आहे.
शेवगा वाण किंवा जाती कोणत्या लावावेत हा या लेखाचा प्रमुख हेतू आहे. महाराष्ट्र व भारतभर जे शेवगा प्रसिद्ध वाण आहेत, त्यातील नामवंत व जास्तीत जास्त शेंगा देणाऱ्या निवडक वाणाची माहिती या लेखात आहे.
आपण बांधावर, बंगल्यात परसदारी किंवा स्वतंत्र शेवगा शेती लावा. अगर फळबागेत अंतर पीक म्हणत लावा, या शेवगा वाणाची खासियत व वैशिष्टय़े लक्षात घ्या. त्या प्रमाणे वाणाची निवड करा.
शेवगा शेती ही रोप लागवडीपासून केवळ सहा महिन्यात उत्पादन देते. ते १० वर्षे शेंगा देते.
वाणातील पी. के. एम २ या वाणाची बंगल्यात, परसात, बांधावर १० झाडे लावून दरसाल ५००० ते ६०० रुपये मिळवणारी मंडळी आहेत.
२) वाण व त्यांची वैशिष्टय़े- १) जाफना - हा शेवगा वाण स्थानिक व लोकल आहे. देशी शेवगा म्हणून ओळखतात. या वाणाच्या शेंगा चवदार असतात. या वाणाचे वैशिष्टय़ एका देठावर एकच शेंग येते. ती २० ते ३० सें.मी. लांब असते. या वाणाला वर्षांतून एक वेळ म्हणजे फेब्रुवारीत फुले लागतात. मार्च, एप्रिल, मे मध्ये शेंगा मिळतात. एक किलोत २० ते २२ शेंगा बसतात. दर झाडी एक हंगामात १५० ते २०० शेंगा मिळतात. चवीला चांगली. बी मोठे होतात.
२) कोकण रुचिरा - हा वाण कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केला आहे. कोकणासाठी शिफारस केला आहे. झाडाची उंची ५ ते १६ मीटर. या एका झाडाला १५ ते १७ फांद्या उपफांद्या येतात. शेंगा गर्द हिरव्या रंगाचे असतात. या वाणाचे उत्पादन ओलीताखाली सर्वोत्तम येते. शेंगा या एका देठावर एकच लागते. या वाणाला एकाच हंगामात शेंगा येतात. साइज मध्यम त्यामुळे वजन कमी भरते. दर झाडी पी.के.एम. २ या वाणाचे तुलनेत ४० टक्के उत्पन्न मिळते.
३) पी. के. एम. १ - हा वाण तामीळनाडू कृषी विद्यापीठाचे पेरीया कुलम फळबाग संशोधन केंद्राने विकसित केला आहे. हा वाण चवदार आहे. या वाणात खालील अनेक वैशिष्टय़े आहेत. १) रोप लावणी नंतर ६ महिन्यात शेंगा सुरू होतात. २) शेंगा ४० ते ४५ सें. मी. लांब असतात. ३) या वाणाला महाराष्ट्र वातावरणात वर्षांतून दोन वेळा शेंगा येतात. ४) शेंगा वजनदार व चविष्ट, मात्र बी मोठे होत नाही. ५) या वाणाची झाडे ४.५ ते ५ मीटर उंच होतात. ६) दोन्ही हंगामात मिळून ६५० ते ८५० शेंगा ओलीताखाली मिळतात.
४) पी. के. एम. २ - हा वाण देखील तामिळनाडू कृषी विद्यापीठाने विकसीत केला आहे. हा वाण आज महाराष्ट्रातील स्वतंत्र शेवगा शेतीत तसेच अंतर पीक शेवगा शेतीत आहे. १) शेवगा शेतीतली खरी क्रांती या वाणानेच केली आहे. २) भारतात आज ज्ञात असलेल्या सर्व शेवगा वाणात हा वाण विक्रमी उत्पादन देतो. दोन हंगामात ओलीता खाली व छाटणी आणि खत व्यवस्थापन उत्तम ठेवल्यास ८०० ते ११०० शेंगा दर झाडी मिळतात. ३) या वाणाचे शेंगा रुचकर व स्वादिष्ट आहेत. ४) सर्व वाणात लांब शेंगा असणारा हा वाण आहे. शेंगा ७० ते ८० सें. मि. लांब येतात. ५) लांब शेंगा वजनदार शेंगा यामुळे बाजारभाव सर्वोत्तम व सर्वात जादा मिळतो. ६) एका झाडाला एकाच हंगामात २१९० शंगा मिळवण्याचा विक्रम या वाणाने केला. ७) या वाणात एका देठावर ४-५ शेंगाचा झुपका येतो. हे वैशिष्टय़ इतर कोणतेही जातीत नाही. ८) बेन ऑइलसाठी व पाणी शुद्ध करण्यासाठी याच वाणाला प्राधान्य दिले जाते.
९) सध्या याच वाणाची परदेशी निर्यात केली जाते.
थोडक्यात, पी.के.एम.२ हा वाण लावणे, वाढवणे, जोपासणे योग्य आहे. महत्त्वाचे आहे.
या वरील वाणाखेरीज शेवगा पिकाचे महाराष्ट्रात खालील वाण आढळतात. मात्र ८० ते ८२ टक्के लागवड ही पी.के.एम. २ ची आहे.
१) दत्त शेवगा कोल्हापूर, २) शबनम शेवगा, ३) जी.के.व्ही.के. १ व जी.के.व्ही ३, ४) चेन मुरिंगा, ५) चावा काचेरी. मात्र जादा उत्पादन २ वेळ हंगाम व चव आणि लांबी या दृष्टीने पी.के.एम. २ सर्वश्रेष्ठ आहे. शेवगा पिकावर सध्या राज्यात खालील पुस्तके उपलब्ध आहेत.
१) शेवगा - वि. ग. राऊळ, २) शेवगा लागवड - डॉ. ठोंबरे, ३) शेवगा - डॉ. राहूडकर.
रोपासाठी संपर्क- पुणे (०२०) २६९९५९०४, नगर ९४२६०४६७१६.
वि. ग. राऊळ

11 comments:

 1. शेती संबंधित सर्व काही, फक्त एका क्लिक वर !
  शेतमालाची विक्री असो अथवा सोलर हिटर घ्यायचा असो, तुमच्या कृषी व्यवसायाची मोफत जाहिरात करायची आहे अथवा कृषी सल्ला हवा आहे … तुमच्या सर्व प्रश्नांसाठी " ग्रिन इकोसिस्टीम " हेच सर्वोत्तम उत्तर. कृषी संबंधी व्यवसाय संधी, विविध शेती उपकरणे व त्यांचे डीलर… बि-बियाणे व त्यांचे सप्लायर आणि बरेच काही … शेतीमाल, शेती उपकरणे, जनावरे यांची खरेदी व विक्री, एखादा प्रश्न असो किंवा व्यावसाईक कृषी सल्लागार पाहिजे … इतकंच काय शेती संबंधित सर्व काही, फक्त एका क्लिक वर !

  आताच आमच्या www.greenecosystem.in वेबसाईट भेट द्या !

  ReplyDelete
 2. सुंदर. माहिती

  ReplyDelete
 3. शेवगाची २५०० रोपे पाहिजे

  ReplyDelete
 4. महीती चांगली मिलाली. धन्यवाद.

  ReplyDelete
 5. महीती चांगली मिलाली. धन्यवाद.

  ReplyDelete
 6. उपयुक्त माहिती दिल्या बद्दल मनापासुन धन्यवाद.!!!

  ReplyDelete
 7. Rohit 1 baddal kahi mahiti milel ka?

  ReplyDelete
 8. apali mahiti khoop nice ahe. ya pude hi adhik mahiti chi apekasha karin

  ReplyDelete
 9. apali mahiti khoop nice ahe. ya pude hi adhik mahiti chi apekasha karin

  ReplyDelete
 10. रोहित- १ या वाणाबद्दल माहीती द्यावी.कारण मराळेंच्या माहीतीवरुन तोच exportसाठी चालतो!
  तसेच ओडीसी वाण ब-याच व्हिडीओत export साठी वाखाणला जातो..तर तो वाण कोणता ?
  आमचा नवीन अभ्यासकांचा खूपच गोंधळ उडतो आहे..

  ReplyDelete
 11. रोहित- १ या वाणाबद्दल माहीती द्यावी.कारण मराळेंच्या माहीतीवरुन तोच exportसाठी चालतो!
  तसेच ओडीसी वाण ब-याच व्हिडीओत export साठी वाखाणला जातो..तर तो वाण कोणता ?
  आमचा नवीन अभ्यासकांचा खूपच गोंधळ उडतो आहे

  ReplyDelete