Saturday, 9 February 2013

केळीतील अन्नद्रव्यांची कमतरता ओळखा

नायट्रोजन -पाने पिवळी पडू लागतात आणि मध्यशिरेवर लाल-गुलाबी टिंब दिसू लागतात. पाने गुच्छ आकारात दिसतात. मुळांची वाढ थांबली किंवा जमिनीची वाढ थांबली किंवा जमिनीची खार प्रतवारी अधिक असली तर ही लक्षणे आणखी वाढतात.
पोटॅशियम
पोटॅशियमच्या कमतरतेने जुन्या पानांचा रंग नारंगी पिवळा होतो आणि पाने लवकर सुकू लागतात. पाने अकाली वाढल्याने रोपांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. पोटॅशियमच्या कमतरतेमुळे पानांचा आकार छोटा असतो, घड उशिरा येतात, प्रती घडाला फळांची संख्या कमी असते, फळांचा आकार कमी आणि भरीवपणा कमी होतो.

कॅल्शियम
कॅल्शियम कमतरता झाल्यास त्याची लक्षणे नव्या पानांवर सर्वप्रथम दिसतात. पानांच्या कडांच्या नसांमध्ये क्लोरोसीस सुरू होते. जे पानांच्या अग्रभागी वाढत जाते. जेव्हा ते वाळतात तेव्हा पानांच्या कडा फाटतात आणि नॅक्रोटिक होतात. ही लक्षणे उन्हाळा सुरू होतानाच्या वाढीत दिसतात किंवा त्या भागात जिथे पोटॅशियम रोपांना अधिक प्रमाणात दिले जाते, तिथे ही लक्षणे दिसतात.
मॅग्नेशियम
साधारणपणे केळीच्या जुन्या बागांमध्ये मॅग्नेशियमची कमतरता आढळते. पोटॅशियम जास्त प्रमाणात दिले गेल्याने ही कमतरता आढळते. पानांच्या कडा पिवळ्या पडणे, पानावर बैंगनी रंगाचे डाग पडणे, पान खोडापासून अलग/वेगळे होणे.
गंधक
गंधकाच्या कमतरतेने पानांचा रंग पिवळा होत होत पांढरा होतो. कमतरता जास्तच असेल तर नॅक्रोटिक डाग दिसतात, रेषा जाड,

No comments:

Post a Comment