Tuesday, 16 April 2013

स्थानिक सेंद्रिय शेतीची मानके

organic_farming
१) सेंद्रिय कूषी पध्दतीत रासायनिक व जैविक प्रक्रिय केलेल्या पदार्थाचा वापर करु नये .सेंद्रिय शेती व शेतमाल याचे प्रमाणिकरण करण्याकरीत शेती सलग तीन वर्षापूर्वी पासून रसायन मुक्त असावी .
२) बी-बियाणे, वाण (धनधान्यांचे ,पशुपक्षांचे ) शक्यतो गावरानच वापरावे .असे वाण रोग व कीड प्रतिकारक असतात .शिवाय कोणत्याही वातावरणात उत्तम प्रकारे वाढू शकतात बि -बियाणे सेंद्रिय शेतीतीलच वापरावे .असे न मिळाल्यास आपल्या शेतीत पूर्वी तयार केलेले वापरावे .
३) पिकांची फेरपालट करुन जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण वाढवावे आणि कीड व रोगांचे नियंत्रण करावे.
४) जमिनीची सुपिकता व जिवंतपणा वाढविण्यासाठी शेतीत व परिसरात उपलब्ध असलेले सेंद्रिय पदार्थ ,हिरवळीची खते ,कंपोस्ट खत ,गाडूळ खत ,खोल मूळे जाणा-या वनस्पती इत्यादी वापराव्यात शिवाय द्विदल पिकांची लागवड करणे आवश्यक आहे.
५) बीज प्रक्रियेसाठी नैसर्गिक व पारंपारिक पध्दतीचा वापर करावा उदा. जीवाणू खते ,राख ,गोमूत्र इत्यादी
६) पिकांचे संरक्षण करताना रासायनिक कीटक ,बुरशी व तण -नाशकांच्या जागी निबोळी अर्क ,सापळा पीके,मित्र पीके,लसून -मिरची -ताक मिश्नण, परोपकारी जीवजंतु व कीटकांचा वापर करावा .पिकांची फॆरपालट करावी
७) पिकांची वाढ व विकास होण्याकरिता रासायनिक वाढ नियंत्रकांचा संप्रेरकांचा उपयोग सेंद्रिय शेतीत करु नये त्याऎवजी शेती व परिसरातील वनस्पती,प्राणी सुक्ष्मजीवजंतुपासून पारंपारिक पध्दतीने तयार केलेली कीड व रोग निय़ंत्रके वापरावीत .
८) शेजारच्या शेतीतून सेंद्रिय शेतात रासायनिक कीटकनाशके रोग नाशके इत्यादी शिवाय रासायनिक येणारे नाहीत याची काळजी घ्यावी .
९) शेत जमिनीवर व बांधावरील विविध वनस्पती ,लगवड केलेली झाडे ,गिरीपुष्प ,शेवगा ,कडुनिंब व इतर नैसर्गिक वनस्पती यांचे संरक्षण करावे .
१०) सेंद्रिय शेतातील पाळीव प्राणी ,पक्षी यांचे संगोपन करीत असतांना त्याचा आहार सेंद्रिय असावा व त्यांच्या आरोग्याचे नैसर्गिक पध्दतीने संरक्षण करावे .आणीबाणीच्या वेळी जीव रक्षणासाठी प्रचलित औषधोपचार करावे.
११) सेंद्रिय शेती पध्दतीने करण्याचे ध्येय असावे. अन्यथा शेतीचा सेंद्रिय व असेंद्रिय भाग याचे व्यवस्थापन स्पष्टपणे वेगवेगळे असावे.
१२) सेंद्रिय शेतक-याने दैनंदिन नोदवहीत शेतीसंबंधी सर्व कामाची नोद करणे आवश्यक आहे .खरेदी-विक्रिचे कागदपत्र जपून ठेवणॆ आवश्यक आहे

No comments:

Post a Comment