Thursday, 9 May 2013

प्रक्रिया उद्योगातील प्रशिक्षणासाठी महत्त्वाच्या संस्था

शेतीमधील नवीन तंत्रज्ञानाबरोबरीने इंटरनेटवरदेखील माहितीचा प्रचंड खजिना उपलब्ध आहे. देशातील महत्त्वाच्या संस्थांच्या वेबसाइटवर (संकेतस्थळ) काय पाहाल, त्याबाबतची माहिती...

शेतीसंबंधी उपयुक्त संकेतस्थळे - www.cftri.com - केंद्रीय अन्नतंत्रज्ञान संशोधन संस्थेचे (सीएफटीआरआय) हे संकेतस्थळ आहे. अन्नप्रक्रिया करण्याच्या विविध पद्धती, त्यासाठी लागणारी यंत्रसामग्री, पदार्थांच्या दर्जाबाबतचे धोरण, कमी कालावधीचे प्रशिक्षण कार्यक्रम, टेंडर्स, नवी भरती, पेटंट यासंदर्भातील माहिती या संकेतस्थळावर आहे. तसेच, संस्थेने केलेल्या नव्या संशोधनाची माहिती देणारी न्यूजलेटर्स, संस्थेची प्रकाशने, आंतरराष्ट्रीय परिषदांची माहिती या संकेतस्थळावर आहे.

www.ciphet.in - लुधियाना येथील केंद्रीय काढणीपश्‍चात अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान संस्थेचे (सिफेट) हे संकेतस्थळ आहे. त्यावर संस्थेची आणि पदाधिकाऱ्यांची माहिती आहे. तसेच, संस्थेमध्ये चालणारे संशोधन, या संशोधनाच्या वापरामुळे झालेल्या यशोगाथा, उपलब्ध असलेल्या सुविधा, संस्थेच्या संशोधनाची माहिती देणारी प्रकाशने, न्यूजलेटर्स, माहितीचा अधिकार, नॅशनल ऍग्रिकल्चरल इनोव्हेशन प्रोजेक्‍ट, संस्थेची प्रेझेंटेशन्स आदींबाबतची माहिती येथे उपलब्ध आहे.

No comments:

Post a Comment