Wednesday, 18 September 2013

सेंद्रीय व जैविक शेती करा; भरपूर उत्पादन घ्या-001

ठिबक सिंचनाकरिता जिवामृत खालील पद्धतीने फिल्टर करून द्यावे.
५० लिटर पाणी बसणारा कमी उंचीचा प्लॅस्टिक ड्रम घ्यावा. त्याच्या बुडाला १६ एमएम ठिबक चावी व अर्धा इंच व्हॉल बसवावा. ड्रममध्ये तळाला १० इंचांपर्यंत लहान तुकडे असलेला पाचटाचा समान थर दाबून बसवावा. त्याच्यावर दोन पदरी बारीक वायरची जाळी टाकावी. त्या जाळीवर मोठी वाळू व लहान भाजी व विटांचे तुकडे एकत्र करून ४ इंचांचा थर द्यावा. त्याच्यावर पुन्हा २ पदरी वायरची जाळी टाकावी व त्या जाळीवर तयार जिवामृत ओतावे. अध्र्या तासांनी चावीद्वारे बादलीत घ्यावे ते पूर्ण फिल्टी होऊन येते ते ठिबक मधून दर आठवड्याला ऊस पिकास ५० लिटर द्यावे. भाजीपाला पिकासाठी ३ दिवसाला २५ लिटर द्यावे.
ऊस लागवणीची पद्धत-
मागे सांगितल्याप्रमाणे पाटपाणी असणारे शेतकरी बांधवांनी तीन ते सव्वातीन फुटांनी सरी सोडून त्यावर दींड मारून माती २५ टक्के खाली घेऊन सरीत बांडगे मारलेवर सपाट भुंड्यावर हातकुरीने चर घेऊन सिंगल लाईन सोयाबीन, भुईमूग अथवा बिस्किट घेवडा घ्यावा किंवा सपाट भुंड्यावर ३ लाईन खरीपातील ९० दिवसांत निघणारा कांदा घ्यावा. सर्व भुंड्यावरील चरीत व सर्व भुंडयावर पसरून टाकावा व सोयाबीन किंवा घेवडा चार इंचांवर १ बिया व भुईमूग असलेस ६ इंचावर २ बिया टोकण करून चर मुजवावी. कांदा करणा-यांनी तीन लाईनीत प्रत्येक लाईनला ४ इंचांनी कांदा रोप लागण करावी. यामुळे आंतरपिकातून ऊस पिकाचा खर्च निघतो. म्हणून शून्य भांडवली खर्चात ऊस उत्पा-
दन निघते. ठिबकवाल्यांनी मोकळ्या पाईपला कोणतेही आंतरपीक घ्यावे. यानंतर ऊसाची लागण करताना पाटपाणी असणा-यांनी २ सरी ऊस लागण व १ सरी रिकामी सोडावी. ठिबकवाल्यांनी एका पाईपला जोड ओळ व दुसरी पाईप रिकामी व या रिकाम्या पाईपला आंतरपीक घ्यावे. या दोन्ही पद्धतींत १० फुटांवर जोड ओळ ऊस लागण होते. त्यामुळेच उसाची रोपे अथवा डोळा पाच बाय सव्वा फूट या प्रमाणे येतो. १ साधारण ७ हजार रोपे अथवा डोळे लागतात व कमीत कमी १ डोळ्यातून १५ ऊस सरासरी जिवंत सक्षम मिळतात. दीड किलोचा जरी सरासरी ऊस आला तरी १५० टन एकरी ऊस उत्पादन निघते.
फवारणी व्यवस्थापन-
रोप लागण असेल तर रोप सेट झाल्यावर व कांडी एक पद्धती लागण असेल तर उगवणीनंतर ५ ते ७ पाने आलेपासून दर १० दिवसाला प्रतिलिटर पाण्यासोबत २ मिली व्हर्मीगोल्ड प्लस + २ मिली बायो एन्झाईम प्लस+ २ मिली १९:१९:१९ सेंद्रीय द्रवरूप एन.पी.के + २ मिल गोमुत्र मिक्स करून कांडी तयार होईपर्यंत फवारणी द्यावी. व कांडी झाल्यानंतर दर १० दिवसांपी जोपर्यंत फवारणी देता येते तोपर्यंत प्रतिलिटर पाण्यासोबत २ मिली व्हर्मीगोल्ड प्लस + २ मिली बायो एन्झाईम + ४ मिली गोमुत्र +२ मिली ०५२३४ सेंद्रीय द्रवरूप एन.पी.केची फवारणी सुरू ठेवावी.
अशा पद्धतीने काटेकोरपणे खत व फवारणी व्यवस्थापन ठेवल्यास १०० टक्के सेंद्रीय जैविक पद्धतीत १ ग्रॅमही रासायनिक खत न देता एकरी १५० टन ऊस निघतो. त्याच बरोबर आंतरपिकालासुद्धा याच फवारण्या ठेवाव्यात किंवा ज्यांना फक्त सोयाबीन व भुईमूग पीक घ्यावयाचे त्यांनी मागे सांगितलेला अर्धा डोस ( मिक्स २० पोती) एकर टाकावा. त्याचबरोबर फवारणी व्यवस्थापन उसाचे आहे तेच ठेवावे.
खोडवा पिकाचे व्यवस्थापन-
ऊस तुटून गेल्यानंतर ज्यांना खोडवा घ्यावयाचा
आहे त्यांनीही सुरुवातीला खोडवा मशागती वेळी मागे सांगितलेला पूर्ण डोस द्यावा. त्यानंतर ७ महिन्यांपर्यंत दर महिन्याला अर्धा डोस द्यावा. खोडवा पिकातसुद्धा मोकळ्या सरीच्या दोन्ही बाजूला झेंडू, मेथी, कोथिंबीर ही आंतरपिके घेता येतात. मशागतीनंतर पहिल्या पाण्यालाच आंतरपिकाची लागण करावी.
खोडवा पिकाचे फवारणी व्यवस्थापन-
खोडवा पिकालासुद्धा लागणीला जे फवारणी व्यवस्थापन सांगितले आहे अगदी तसेच कांडी बनण्यापूर्वी व नंतरचे जसेच्या तसे फवाणी व्यवस्थापन करावे.
-ेकाकासाहेब पाटील
मु. पो. नागाव, ता. वाळवा, जि. सांगली
मोबा. ९५२७९ ११७७७

No comments:

Post a Comment